आटपाडी

पियूष बालटे याचे आंतरराष्ट्रीय अबॅकस ऑलिम्पियाड स्पर्धेत यश

सी कॅटेगरी मध्ये पियूष पोपट बालटे याने तीन मिनिटात विविध स्पर्धा परीक्षा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवत चॅम्पियनशिप मिळविली.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : 29 देशाचा सहभाग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयमा अबॅकस ऑलिम्पियाड स्पर्धा २०२४ च्या स्पर्धेमधून आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथील 8 वर्षीय पियूष पोपट बालटे या विद्यार्थ्यांने ग्रेड सी मधून तिसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत सी कॅटेगरी मध्ये पियूष पोपट बालटे याने तीन मिनिटात विविध स्पर्धा परीक्षा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवत चॅम्पियनशिप मिळविली. पियूष बालटे हा विदयार्थी आटपाडी येथील ‘ वि. रा. लोणारी (दादरे) गुरुकुल विद्यालय‘ या विदयालयात इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे.

तो उत्कर्ष क्रिएशन मधून 9 महिने अबॅकसचे क्लास घेत 29 देशाचा सहभाग असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयमा अबॅकस स्पर्धेत पियूषने सहभाग घेवून विविध स्पर्धत प्राविण्य मिळविले ही स्पर्धा इंटरनॅशनल हॉटेल रॅडिसन ब्लू मुंबई येथे झाली.
फोटो : पियूष बालटे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button