तुम्ही फडणवीसांची सुपारी घेतली, मला धमकी देऊ नका नाहीतर…जरांगेंचा भाजपच्या खासदारांना इशारा
फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका. नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं. मला धमकी देऊ नका
माणदेश एक्सप्रेस न्युज : अमरावती: मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कायम राहिलेत. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते आता पुढे येत आहेत. यावेळी आणखी एक भाजपचे ज्येष्ठ नेते थेट जरांगेंच्या निशाण्यावर आहे. फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका, असे म्हणत मनोज जरांगेंनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका. नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं. मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो. राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांच ऐकून ते मला बोलत आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली. मी देवेंद्र फडणवीसला मोजत नाही. मराठा समाजाने चांगले चांगले पाया खाली चिरडले आहेत, तुम्ही कोण आहात?
नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं: मनोज जरांगे
नारायण राणेंवर मनोज जरांगे म्हणाले, तो काहीही बरळत आहे. आम्ही कोणाचे उपकार विसरत नाही. त्यांना मला धमकी देण्याची काही गरज नाही. मी गोरगरिबांसाठी काम करतो आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठ करण्यासाठी माझ्या समाजाच वाटोळं करू नका.. मी नारायण राणे यांचा सन्मान करतो…मी मराठा समाजाचे काम करतो म्हणून तुम्ही मला धमक्या देत आहेत.