Viral Video : “रंग बघून प्रेम करू नका!..” तरुणाने दिला सल्ला, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत

पुणेरी पाट्या हा नेहम चर्चेचा विषय असतो. पुणेरी पाट्यांविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पुण्यातल्या पाट्या म्हणजेच पुणेरी लोकांची मार्मिक टिप्पणी असते. सहसा हा एक सुचना फलक असतो ज्यावर एखादी सुचना अत्यंत खोचक शब्दात व मजेशीरपणे लिहिलेली असते.
सध्या या ऑनलाइनच्या जगात पुणेरी पाट्यांचा एक नवीन ट्रेंड आला आहे. काही तरुण मंडळी हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभे राहतात आणि पाटीवर भन्नाट मेसेज लिहितात. जेव्हा रस्त्यावरून येणारी जाणारी लोक हे मेसेज वाचतात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यामध्ये टिपतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका पुणेकर तरुणाने भन्नाट मेसेज लिहिलेला आहे. त्याचा मेसेज वाचून कोणीही थक्क होईल.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील एफसी रोडवरील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. त्याने पाटीवर एक मजेशीर व भन्नाट मेसेज लिहिला आहे. त्याने लिहिलेय, “रंग बघून प्रेम करू नका! कारण लाल मुंगी काळ्या मुंगीपेक्षा जोरात चावते.” या मेसेज वाचून येणारी जाणारी लोक जोरजोराने हसताना दिसताहेत. काही लोक या मेसेजला सहमती दर्शवत आहे तर काही जण या तरुणाचा पाटीसह फोटो काढताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.