उद्धव ठाकरे यांचा युतीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आवाहन
महाविकास आघाडी नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आवाहन केले. आघाड्यांमधील अंतर्गत वादाचे भूतकाळातील अनुभव सांगून ठाकरे यांनी सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याचे धोरण मविआ ने टाळले पाहिजे यावर जोर दिला. या धोरणामुळे आपल्याच दुफळी होते, जागांची पाडापाडी होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात भाजप आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरुन येथेच्छ फटकेबाजी केली. ज्यामध्ये वक्फ बोर्ड जमीनीसंदर्भातील विधेयक, हिंदु मंदिरांतील सोने, जमीनी यांसह पक्ष फोडाफोडी आदी मुद्द्यांचा समावेश होता.
MVA मध्ये निश्चित लीडरशिपची गरज
भाजपसोबतच्या भूतकाळातील युतीचा विचार करताना उद्धव ठाकरे यांनी अंतर्गत स्पर्धेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले अशा स्पर्धेमुळे मित्रपक्ष एकमेकांना अडचणीत आणतात, त्यातून दोघांच्याही कमी जागा निवडून येतात. परिणामी त्यांनी सुचवले की MVA ने एकता आणि स्पष्ट नेतृत्व धोरणाला प्राधान्य द्यावे. “आमचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला मी पाठिंबा देईन,” असे ठाकरे म्हणाले.