आटपाडीत बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडले
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. आटपाडी तालुक्यात मतदान सकाळच्या सत्रात थंडीने मंदावले होते. अशातच, दोन बिहारी युवक मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी आले असता, मतदार प्रतिनिधीच्या सतर्कतेने पकडले गेले. यावेळी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खानापुर विधानसभा मतदार संघात,महायुती कडून सुहास बाबर, महाविकास आघाडी कडून वैभव पाटील तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने, या ठिकाणी निवडणीत मोठी रंगत आली आहे. प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते नागरिकांना मतदान करण्यासाठी आणत आहेत.
अशातच आज आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्याल येथे असणाऱ्या मतदान केंद्रामध्ये मतदान सुरू असताना दोन बिहारी युवक मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मतदार प्रतिनिधीने त्यांना नावे विचारली असता त्यांना मराठी बोलता येत नसल्याचे लक्षात आले. यावेळी तेथील युवकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.