आटपाडीताज्या बातम्या

आटपाडी तालुक्यात दोन आरोग्य केंद्र तर एक उपकेंद्र मंजूर

विशेष बाब म्हणून शेटफळे, झरे आरोग्य केंद्र तर बनपुरीत उपकेंद्र मंजूर : आ.गोपीचंद पडळकर

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे, झरे येथे आरोग्य केंद्र तर बनपुरी येथे आरोग्य उपकेंद्र व पेड ता. तासगांव येथे आरोग्य केंद्र महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांच्या प्रयत्नातून या मागणीस यश प्राप्त झाले आहे. याबाबतचा शासन आदेश बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला असून या गावातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkr) यांचे आभार मानले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून शेटफळे व झरे येथील नागरिकांची आरोग्य बाबत खूप मोठी गैरसोय होत असल्याने येथील नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याची मागणी होती. याबाबत विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fdnvis)यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता.

शेटफळे गावची लोकसंख्या सुमारे दहा हजाराहून अधिक आहे. येथील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळण्यासाठी तब्बल आठ ते दहा किलोमीटरवर जावे लागत होते. यासाठी कोणते शाश्वत अशी वाहतूक व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

याचबरोबर झरे (Zare) येथील नागरिकांना खरसुंडी (Kharsundi) येथील आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी सुमारे 20 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. यामध्ये नागरिकांचा जीवाशी खेळ होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. याच अनुषंगाने आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष बाब म्हणून आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी केली होती. या निर्णयाने शेटफळे, झरे व बनपुरी गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button