सोलापूर

पंढरपुरात पावसाचे प्रमाण कमी पण, भीमा नदीला आला मोठा पुर ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच इशारा

जनी धरणातून भीमा नदीत 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंढरपूरसह भीमा नदीच्या (Bhima River) काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून (Ujani Dam) भीमा नदीत 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 80 हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने पंढरपूरचा पुराचा धोका वाढला आहे. आज दुपार पर्यंत भीमा पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पंढरपूरमध्ये (Pandharpur) प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वीर धरणाचा विसर्ग कमी झाला असला तरी उजनी व वीर धरणाचा एकत्रित विसर्ग भीमा नदीत सुरु असल्याने, नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button