आटपाडीत ज्वेलर्स मधून दागिन्यांची चोरी : दोन महिलांना पोलिसांनी पकडले
दागिने लंपास केल्याची घटना दुकान मालकाच्या सावधानतेने उघडकीस आली
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत शेजारीच असणाऱ्या गुरुदत्त ज्वेलर्स मध्ये काल दोन महिला दागिने घेण्याच्या उद्देशाने येत त्यांनी सुमारे तीन ग्राम वजनाचे दागिने लंपास केल्याची घटना दुकान मालकाच्या सावधानतेने उघडकीस आली. याबाबात ज्वेलर्स मालकपांडुरंग दत्तात्रय देशमुख (वय59) रा.देशमुखवाडी, यांनी संगू उर्फ शोभा शिवाजी कोकरे, मायाक्का सुरेश लोखंडे दोघी रा. खिलारवाडी ता. जत जि. सांगली यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,सोमवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास दोन महिला दुकानामध्ये येवून यातील एका महीलेने जुने कानातील टॉप्स हातामध्ये घेवून हे आम्हांला विकायचे आहे व दुसरे नविन घ्यायचे आहे असे सांगत दुकानातील नविन टॉप्स दाखविणेस सांगितले. त्यावेळी डब्यामध्ये ठेवलेले सोन्याचे टॉप्सचे दोन जोड दाखविले. नुकतेच ज्वेलर्स चालू केले असल्याने मालक अगरबत्ती लावत होते.
त्यावेळीच त्या दोन्ही महिलांनी नजर चुकवून त्यांना दाखविलेले टॉप्सच्या दोन जोडी अंदाजे 2.8 ग्रॅम वजनाच्या 22,000/- रू. किंमतीचे दागिने चोरून घेवून गेल्या. महिलांनी दागिने चोरून नेले असल्याचे लक्षात आल्यावर लगेच ज्वेलर्स बंद करून ज्वेलर्स मळक पांडुरंग देशमुख यांनी सदर महिलांचा शोध घेत बाजारपेठेत, एस.टी. स्टॅन्ड येथे गेलो असता त्या दोघी महीला एस.टी.स्टॅन्ड वर मिळून आल्या.
त्यावेळी त्यातील एका महीलेचे हातात त्यांना ज्वेलर्स मधून चोरून नेलेले टॉप्स दिसले. परंतू सदर महिला चोरून नेलेले टॉप्स त्यांना दाखवत नव्हत्या. याचवेळी त्यांनी वाहतूक पोलीसांना बोलावून घेवून त्या दोन्ही महीलांना पोलीस ठाणे येथे नेण्यात आले. यावेळी महिला पोलीसांनी त्यांची झडती घेतली असता त्यातील एका महीलेच्या हातामध्येदुकानातून चोरलेले सोन्याचे कानातील दोन जोड टॉप्स मिळून आले. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.