सुहासभैय्या बाबर यांना आटपाडी तालुक्यातून सर्वात मोठे मताधिक्य देऊ : राजेंद्र खरात
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील मोटे वस्ती येथे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात व लक्ष्मण मोटे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुहासभैय्या बाबर यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना राजेंद्र खरात म्हणाले. स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी आटपाडी तालुक्याचा कायापालट केला आहे. आटपाडी तालुक्याचा कायमचा दुष्काळ अनिलभाऊच्या माध्यमातून मुक्त झालेला आहे. तसेच तानाजीराव पाटील हे नेहमी कामात असलेलं नेतृत्व आहे. ते नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात त्यामुळे आपल्याला सुहासभैय्या बाबर यांना आटपाडी तालुक्यातील मोठे मताधिक्य द्यायचा आहे.
1999 ते 2008 या कालावधीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी निवडून आणले होते. त्यासाठी त्यावेळेस त्यांनी मोठी ताकद आठवले साहेबांच्या पाठीमागे उभी केले होते. त्यामुळे सुहासभैयांना एका वर्षात दोन दुःख सहन करावे लागले आहेत. तरीसुद्धा अनिल भाऊंनी शेवटच्या श्वासापर्यंत आटपाडी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी काम करत राहिले आणि ते पूर्णत्वास नेले त्यांच्या पश्चात सुहासभैय्या बाबर यांनी सर्व दुःख विसरून सदैव कामात व्यस्त आहेत.
या विधानसभेला आपण भैय्याच्या पाठीमागे रिपब्लिकन पक्षाची ताकद खानापूर आटपाडी मध्ये उभी करून सुहासभैय्याला जास्तीत जास्त लीडने निवडून येतील असे सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचे आदेश यावेळी दिले.
अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील विकास कामांचा आढावा दिला. व कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन यावेळी मान्यवरांना केले. सुहासभैय्या बाबर यांना मोठे मताधिक्य द्या राहिलेले उर्वरित कामे तातडीने मार्गी लावू असेही यावेळेस सांगितले. मी सतत कामात असणारा माणूस आहे. मला तुम्ही कोणतेही काम सांगा मी ते तातडीने करून देतो असे सांगून तालुक्यातील झालेल्या कामाचा थोडक्यात आढावा अध्यक्षांनी सांगितला. महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याचेही यावेळी अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी बैठकीत सुहास भैय्या बाबर यांना मोठ्या ताकतीने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी सर्वच मोटे वस्तीतील ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी दत्तात्रय पाटील पंच, मनोज नांगरे पाटील, पोपट पाटील (पंच) बालाजी पाटील, आटपाडी शहराध्यक्ष शशिकांत मोटे , महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुष्मिता मोटे मॅडम, प्रमिला मोटे,युवक जिल्हा उपाध्यक्ष शरद वाघमारे, संजय मोटे, समाधान खरात, विलास धांडोरे, राजेश मोटे, चंद्रकांत मोटे, राहुल काटे, विकास मोटे, वैभव मोटे, साहिल खरात, किरण मोटे, यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते.