पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत तुफान गर्दी; बँकेबाहेर रांगाच रांगा
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत साधारण 96 लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये पाठवले आहेत. दरम्यान, हेच पैसे काढण्यासाठी महिला बँकेत तुफान गर्दी करत आहेत. भिंवडीतील बँकांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पैसे काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे. भिवंडी शहरातील अनेक बँकांमध्ये ही गर्दी झाली आहे. योजनेचे पैसे खात्यावर खरंच आले आहेत का? हे तपासण्यासाठी आणि जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी ही गर्दी केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अनेक महिलांच्या बँक खात्याची केवायसी झालेली नाही. त्यामुळेदेखील महिला ही गर्दी करत आहेत.
अशाच प्रकारची गर्दी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पाहायाला मिळत आहे. महिलांनी बँकेमध्ये तसेच बँकेच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. दरम्यान या गर्दीमुळे बँकांत चेंरगाचेंगरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी बँकांत कोणतीही उपयोजा करण्यात आलेली नाही.