कोल्हापूर
शिरोळ : अकिवाट महापुरात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला
माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा अद्यापही शोध लागलेला नाही

माणदेश एक्सप्रेस न्युज : शिरोळ : अकिवाट ता. शिरोळ येथे काल (शुक्रवार) सकाळी दत्तावाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यातच उलटला होता. यामध्ये आठजण पाण्यात वाहून जात होते. त्यालपैकी सहाजण सुखरूप बाहेर आले होते, तर माजी जि. प. सदस्य इकबाल बैरगदार, आण्णासाहेब हसुरे दोघे पाण्यात वाहून गेले होते. या दोघांचाही शोध सुरू होता.
त्यापैकी आज (शनिवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना शोध मोहिमेत माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला. दरम्यान हा मृतदेह अकिवाट, राजापूर दरम्यान मिळून आला. माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा अद्यापही शोध लागलेला नाही, त्यांची शोध मोहीम सुरू असून वजीर रेस्क्यू फोर्सची टीम त्यांचा शोध घेत आहे.