राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पाहा कोणाला कुठून संधी?

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.
दुसऱ्या यादीमध्ये अकोल्यामधून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिरसमधून उत्तम जाणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
1. एरंडोल-सतीश अण्णा पाटील 2. गंगापूर-सतीश चव्हाण 3. शहापूर-पांडुरंग बरोरा 4. परांडा-राहुल मोटे 5. बीड-संदीप क्षीरसागर 6. आर्वी-मयुरा काळे 7. बागलान-दीपिका चव्हाण 8. येवला-माणिकराव शिंदे 9. सिन्नर-उदय सांगळे 10. दिंडोरी-सुनीता चारोस्कर 11. नाशिक पूर्व-गणेश गीते 12. उल्हासनगर-ओमी कलानी 13. जुन्नर-सत्यशील शेरकर 14. पिंपरी-सुलक्षणा शीलवंत 15. खडकवासला-सचिन दोडके 16. पर्वती-अश्विनीताई कदम 17. अकोले- अमित भांगरे 18. अहिल्या नगर शहर-अभिषेक कळमकर 19. माळशिरस-उत्तमराव जानकर 20. फलटण-दीपक चव्हाण 21. चंदगड-नंदिनीताई बाबुळकर-कुपेकर 22. इचलकरंजी-मदन कारंडे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.