खानापूर-आटपाडी विधानसभेसाठी ‘वंचित’ कडून उमेदवार जाहीर
महायुतीकडून कुणाची उमेदवारी जाहीर होणार?
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असतानाच, निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वंचितने राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण, खानापूर या जागांचा समावेश आहे.
खानापूर-आटपाडी मधून संग्राम माने उमेदवार
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघामधून ओबीसी नेते संग्राम माने यांना वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. संग्राम माने हे ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांनी नागेवाडी पंचायत समिती गणातून खानापूर पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी तीव्र लढा दिला होता. ओबीसी समाजाचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले.
महायुतीकडून कुणाची उमेदवारी जाहीर होणार?
खानापूर विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीतून शिवसेनेचे सुहास बाबर, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजितदादा गटाचे अॅड. वैभव पाटील, भाजपचे ब्रम्हानंद पडळकर तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. महायुतीतच इच्छुक उमेदवारांची रेलचेल असतानाच, व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर नसल्याने, वंचित बहुजन आघाडीने मात्र त्यांच्या पुढे एक पाऊल टाकले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पहिले उमेदवार
रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण- फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने खानापूर विधानसभा मतदारसंघातून संग्राम कृष्णा माने यांना उमेदवारी जाहीर …! #VBAForIndia pic.twitter.com/3rAdIcrirU
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 21, 2024