ताज्या बातम्यामहाराष्ट्रसांगली
Sangli Viral Video: बस चालकाला बेदम मारहाण, सांगलीतील मिरजेमधील घटना; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल…

माणदेश एक्सप्रेस/ सांगली : मिरज एसटी बस स्थानकात घुसून एका बस चालकाला संतप्त नातेवाईकांनी चक्क मारहाण केली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताय.
सांगलीच्या पटेल चौकात एका दिव्यांग प्रवाशाला उतरायचे होते, मात्र बस न थांबता पुढे गेली. त्यामुळे प्रवाशाच्या नातेवाईकांचा संताप उफाळून आला. नातेवाईकांनी बसचा पाठलाग करून मिरज एसटी स्थानकात बसला गाठले आणि चालकाला मारहाण केली.
या घटनेदरम्यान काही बस चालक आणि नागरिकांनी हस्तक्षेप करत त्या चालकाला नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले. या घटनेमुळे बस स्थानकात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.