ताज्या बातम्यासोलापूर

राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून एकनिष्ठ नेत्याची उमेदवारी केली जाहीर : भाजपच्या विरोधात ठोकला शड्डू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.

माणदेश एक्सप्रेस न्युज : पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईच्या शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, (Bala Nandgavkar) तर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांच्या नावाची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. भाजप आमदाराच्या मतदारसंघात धोत्रे यांच्या रुपाने पहिला उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी भाजपच्या विरोधात शड्डू ठोकल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मान्यवरांशी रविवारी सायंकाळी चर्चा केल्यानंतर आज सकाळपासून ते जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. या ते पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

या आढावा बैठकीनंतर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील किती मतदारसंघात मनसे निवडणूक लढवणार, हे जाहीर निश्चित होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मतदारसंघाचा आढावा घेत असतानाच राज यांनी दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांच्याकडे नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. तसेच, पक्षसंघटना वाढीसाठी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी त्यावेळी दिलीप धोत्रे यांच्यावर मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती. याशिवाय दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसे सहकार आघाडीच्या प्रमुखपदही देण्यात आलेले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत. भाजपच्या विरोधात उमेदवार देऊन राज ठाकरे यांनी शड्डू ठोकल्याचे मानले जात आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. आता पुन्हा ते विधानसभेसाठी इच्छूक आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा मध्ये सध्या भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहे. त्यामुळे ही जागा भाजपची असणार असून राज ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्यामुळे भाजप-मनसे युतीला सध्यात्री खो बसला आहे. दिलीप धोत्रे यांना विद्यमान आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade ) यांच्या बरोबरच इच्छुक असणाऱ्या माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Parichark), विठ्ठला साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, (Bhagirath Bhalake) विद्यमान अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit patil) यांचे देखील तगडे आव्हान असणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button