….अन्यथा, दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकणार : दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे यांचा इशारा
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सावंत यांच्या मनमानी कारभारामुळे दिघंची परिसरातील रुग्ण त्रस्त झाले असून, त्यांच्या कारवाई करावी अन्यथा दिघंची प्राथमिक केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिघंचीचे माजी सरपंच अमोल (Amol More) यांनी दिला आहे.
दिघंची येथे प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी दिघंची परिसरातील वाड्या-वस्त्यावरील अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. परंतु येथील डॉक्टर सावंत यांच्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डॉ. सावंत यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्ण त्रस्त आहेत. डॉ. सावंत रुग्णांना स्वतः तपासणी न करता हाताखालील ज्युनियर यांना तपासणी करावयास सांगतात. आरोग्य केंद्राकडे गोळ्या व औषधे उपलब्ध असतानाही खाजगी मेडिकल मधील औषधांच्या चिठ्या देतात यामागे त्यांचे कमिशन ठरलेले आहे. रुग्णांशी उद्धट भाषेत वागतात.
डॉ. सावंत यांच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य केंद्र बदनाम झाले आहे व रुग्णांना सेवा दिल्या जात नाहीत व उपचार होत नाहीत तरी सदर डॉ. सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा गुरुवार २६/०९/२०२४ पासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणेत येवून आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा अमोल यांनी दिला असून सदरचे निवेदन हे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.