शिक्षक समितीच्या वतीने आम. गोपीचंद पडळकर यांचा सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : जत विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचा आटपाडी तालुका शिक्षक समितीच्या वतीने झरे ता. आटपाडी येथे यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, शिक्षक समिती ही शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठवणारी सांगली जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी संस्था असून शिक्षकांच्या वतीने केलेला सन्मान हा सर्वात मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु. टी. जाधव , डॉ. आंबेडकर, शाहु ,फुले रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, शिक्षक समिती तालुका नेते शामराव ऐवळे, आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, सरचिटणीस व तालुका पतसंस्था व्हा. चेअरमन नानासाहेब झुरे,तालुका पतसंस्थे संचालक रावसाहेब देवडकर, केंद्रप्रमुख ज्योतीराम सोळशे ,वामनराव सोळंकी, सचिन सासणे, विठ्ठल डोंबाळे, नामदेव अनुसे, दाजी ठेंगले, विजयकुमार मोटे याचबरोबर युवा नेते विनायकराव पाटील ,चंद्रकांत दौंडे, चंद्रकांत काळे , चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे , रघुनाथ यादव ,गारळे अण्णा आदी उपस्थित होते.