ताज्या बातम्यामहाराष्ट्रसांगली

सांगलीत आज ओबीसी महाएल्गार मेळावा ; छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांची प्रमुख उपस्थिती

या मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगलीत आज 11 ऑगस्ट रोजी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार होणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी हा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे.

11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे ओबीसी आरक्षण मागणीसाठी महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लाखो ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत.

यासोबतच या मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या मेळाव्यास ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन ओबीसी नेत्यांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button