आटपाडीताज्या बातम्या
आटपाडी आगाराच्या महिला अधिकाऱ्याची मुजोरी

आटपाडी आगाराच्या एका महिला अधिकाऱ्याचा मस्तवालपणा चव्हाट्यावर आला आहे. या अधिकाऱ्याला बसमधून उतरण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागा दिली नसल्याचा राग मनात धरून या अधिकाऱ्याने चक्क विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पास काढून घेतले. हे पास घेऊन या अधिकाऱ्याने आपले घर गाठले.
त्यानंतर या बसमधील वाहकाने संबंधित विद्यार्थ्यांना तिकीट काढायला लावले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी कवठेएकंद येथे दोन तास आटपाडी – सांगली ही बस अडवून ठेवली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याप्रकरणी संबंधित वादग्रस्त महिला अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
पहा व्हिडीओ