दिघंचीत सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मंत्री शंभूराजे देसाई यांची जाहीर सभा
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर-आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची जाहीर सभा आज दिनांक १६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता दिघंची येथील महादेव मंदिर पटांगण येथे संपन्न होणार असल्याची माहिती दिघंची सरपंच अमोल मोरे यांनी दिली.
खानापूर मतदार संघातून महायुतीकडून सुहास बाबर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर, महायुतीमधून शिवसेनेकडून सुहास बाबर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मतदार संघामध्ये सुहास बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
दिघंचीमध्ये प्रथमच मंत्री शंभूराजे देसाई यांची जाहीर सभा होत असल्याने मतदार संघातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. या सभेसाठी दिघंची परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल मोरे यांनी केले असून, या सभेसाठी मोठ्या प्रमाणत गर्दी होणार असल्याने, महायुतीच्या कार्यकर्त्याकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे.
सुहास बाबर यांची सभा पाहण्यासाठी क्लिक करा