ताज्या बातम्यामहाराष्ट्र

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार की? वाढणार? काय सांगतो, हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय?

माणदेश एक्सप्रेस न्युज : Mumbai : राज्यात सध्या परतीच्या पावसाचा मोठा जोर दिसून येत आहे. पावसाने अनेक जिल्ह्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेती पिकांनी मोठा फटका बसला आहे. परंतु या पावसाचा जोर आणखी किती दिवस कायम राहणार? असा प्रश्न सर्वांनांच पडला असेल. तर ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

राज्यात उद्यापासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरपर्यंत खानदेश, नाशिक नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अशा 18 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तसेच मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते असे खुळे म्हणाले. (स्त्रोत : एबीपी माझा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button