आटपाडीताज्या बातम्या
रिपब्लिकन (आठवले) पक्षाची खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाची संयुक्त बैठक
सदर बैठकीस सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात मार्गदर्शन करणार आहेत.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खानापूर आटपाडी विधानसभा संदर्भात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीस सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात मार्गदर्शन करणार आहेत.
सदर बैठकीस खानापूर तालुका व आटपाडी तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीत आटपाडी तालुक्याचे रिक्त झालेले अध्यक्ष पद व तालुका कार्यकारणी विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तरी या बैठकीला खानापूर, विटा, आटपाडी येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाधान खरात, शरद वाघमारे, विवेक सावंत यांनी केले आहे.