ताज्या बातम्यानोकरीमहाराष्ट्र

रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची संधी, 10 वी पास असणाऱ्यांसाठी लॉटरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती म्हणावी लागेल. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

रेल्वे रिक्रूटमेंट सेल, नॉर्दर्न रिजनने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही मागवली आहेत. आज म्हणजेच 16 ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये.या भरती प्रक्रियेतून 4096 शिकाऊ उमेदवारांची पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची असून rrcnr.org या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीर आलेले अर्ज हे स्वीकारली जाणार नाहीत. विशेष म्हणजे याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दहावीमध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय डिप्लोमाही त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला अधिसूचनेवर मिळेल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button