ताज्या बातम्याराजकीय

राज्याचे माजी पोलीस महासंचालक चौकशीच्या भोवर्‍यात ; खोट्या गुन्ह्यात अडकवून पैसे उकळल्याचा आरोप

ठाणे क्राईम ब्रॅन्चकडून तपास सुरू

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकार्‍यांवर कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी संजय पांडे हे बुधवारी (दि.11) ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले असून पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता, पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

संजय पांडे यांच्यासह सात जणांना त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर चौकशीसाठी बोलावून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देत पैसे उकळल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 6 ऑगस्ट, 2024 रोजी तक्रारदार व्यापारी संजय मिश्रीमल पुनमिया यांच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात बुधवारी (दि.11) दुपारी संजय पांडे यांची अडीच तास चौकशी करण्यात आली.
ठाणे नगर पोलीस ठाण्यात 26 ऑगस्ट रोजी दाखल गुन्ह्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांचा समावेश होता. सदर प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संजय पांडे हे उपस्थित झाले.

 

गुन्हे शाखा वागळे इस्टेट येथील कार्यालयात पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी स्वतः अडीच तास चौकशी केली. चौकशी बाबत गुप्तता बाळगण्यात आली. तर 3. 45 वाजता माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबाब नोंदवून निघून गेले.

 

 

फिर्यादी संजय पुनमिया काय म्हणाले….
यावेळी बोलताना यातील फिर्यादी संजय पुनमिया म्हणाले, संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे युएलसी प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आमच्यावर तब्बल सहा खोटे गुन्हे दाखल केले. यामागे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना अडकविण्याचा टार्गेट पांडेंचे होते. पांडे यांनी नियमबाह्य आणि कायद्याच्या बाहेर जाऊन हा प्रकार केल्याचा आरोप केला. त्याबाबत तक्रारदाराने ईमेलवर केलेल्या तक्रारीत मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत यातील कथीत आरोपींकडून त्रास सहन केल्याचा दावा केला होता.

 

काय होता दाखल गुन्हा, पांडेंवर का झाला दाखल गुन्हा
तत्कालीन पोलीस महासंचालक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ठाणे नगर पोलिसांमध्ये 2016 मध्ये दाखल झालेल्या एका युएलसी गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केसेसच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सन 2016 च्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्यावर लावलेल्या गुन्ह्यात 166 (अ) आणि 170 (शासकीय कर्मचार्‍यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण), 120 बी (फौजदारी कट), 193 (खोट्या पुराव्यांची निर्मिती), 195, 199, 203, 205, आणि 209 (खोटे विधान आणि न्यायालयाच्या कार्यात अडथळा), 352 आणि 355 (हल्ला), 384 आणि 389 (जबरदस्ती), 465, 466, आणि 471 (खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर) आदी कलमांचा समावेश होता. बेकायदेशीर तपास केल्याप्रकरणी अखेर संजय पुनमिया यांनी संजय पांडे यांच्यासह 7 जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. याच प्रकरणात आज संजय पांडे हे ठाण्यात गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात हजर झालेले होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button