तासगाव तालुका ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन पदी आटपाडीच्या सुपुत्राची निवड
व्हा.चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची निवड झाली आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी गावाचे सुपुत्र आटपाडी पंचायत समिती येथे ग्रामविकास अधिकारी विजय मेटकरी यांची तासगाव तालुका ग्रामसेवक पतसंस्था चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हा.चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची निवड झाली आहे.
तासगांव तालुका ग्रामसेवक पतसंस्था महाराष्ट्र राज्यातील तासगांव तालुक्यात कार्यरत असणारी एक सहकारी संस्था आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण सांगली जिल्हा आहे. संस्थेचे एकूण ४५० सभासद आहेत.
विजय मेटकरी यांची निवड या पतसंस्थेच्या विकास आणि व्यवस्थापनात महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. पतसंस्थेच्या उद्दिष्टांनुसार सभासदांना अधिक चांगल्या सुविधा देवून संस्थेचा कारभार योग्य करून सभासदांच्या विश्वासास पात्र राहून काम करण्याचे निवडीनंतर विजय मेटकरी म्हणाले असून, निवडीनंतर त्यांच्यावर समाजातील सर्व स्तररातून अभिनंदन होत आहे.