जत मध्ये इतरांना विरोधक मानात नाही ; गोपीचंद पडळकर , मग जत तालुक्यात गोपीचंद पडळकर यांचे विरोधक कोण ; वाचा सविस्तर
जत तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

माणदेश एक्सप्रेस न्युज : जत : जत तालुक्यामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असून, येथून पुढील काळात जत तालुक्याचा दुष्काळ हाच आमचा विरोधक असून त्याच्या विरोधात आम्ही ठाम उभे असून त्याला नक्कीच पराभूत करू असा विश्वास आम. गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
आम. गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकापर्ण सोहळा संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जत तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने आम्ही ही पाऊले उचलत आहोत. मातब्बर पुढारी जतने दिले तरी मुलभूत समस्या सोडवण्यात अपयशी झाले. ती कसर आपण सर्वांनी भरुन काढायची आहे.
तालुक्यातील उमदी, सुसलाद, सोनलगी, करजगी, बेळुंडगी, बोर्गी, आणि हळ्ळी या गावांतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आम. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. जत तालुक्याच्या प्रगतीसाठी हे पाऊल निश्चितच मोलाचे ठरणार आहे. यावेळी विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व आम. गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.