धनगर आरक्षण प्रश्नी आटपाडी तालुक्यात विविध ठिकाणी रास्ता रोको संपन्न
आटपाडी शहर, दिघंची, झरे, खरसुंडी, बनपुरी, करगणी, नेलकरंजी या ठिकाणी रस्ता आंदोलन करण्यात आले.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे याबाबत आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ रोजी ठीक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने, आटपाडी शहर, दिघंची, झरे, खरसुंडी, बनपुरी, करगणी, नेलकरंजी या ठिकाणी रस्ता आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण (Dhangar Reservation) मिळावं यासाठी 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको (rasta roko) करण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी समाज बांधवाना केले होते. करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली. आदिवासी समाज आरक्षणाबाबत गरज नसताना जर आक्रमक होत असेल तर धनगर समाज सुद्धा आपली ताकद दाखवेल असं पडळकर म्हणाले होते. त्यामुळे आटपाडी तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन संपन्न झाले.
यामध्ये आटपाडी शहरामध्ये बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, विकास भुते, राहुल सपाटे, अनिल हाके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सागर ढवळे यांनी आंदोलन स्थळी येत निवेदन स्वीकारले.
बनपुरी माजी सरपंच व जिल्हा फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष महादेव पाटील, माजी सरपंच संजय यमगर, राजेंद्र यमगर, सुरेश काळे, नवनाथ पुकळे, जिजाराम यमगर, किसान यमगर, मोहन टेलर, भाऊसाहेब ढवळे, सारंग सोन्नुर, दुर्योधन यमगर, दिनेश पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन केले.