आटपाडी बाजार समितीत उद्या विकास कामांचे होणार उद्घाटन

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथे उद्या दिनांक १३ रोजी विकास कामांचे उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पै. संतोष पुजारी यांनी दिली.
आटपाडी बाजार समिती येथे मुख्य बाजार आवार मध्ये उभारण्यात आलेल्या वॉटर टँक RO प्लांट याची उभारणी करणे या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, रासपचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मण सरगर यांच्या हस्ते होणार आहे.
या वॉटर टँक मुळे बाजार समिती येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच व्यापारी वर्गाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. आटपाडी बाजार समितीमध्ये जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरु असून येणाऱ्या काळात बाजार समिती कामाच्या बाबतीत सर्वात पुढे असल्याचे सभापती संतोष पुजारी म्हणाले.