ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जनतेचा कौल पचवता आला नाही की,….? सदाभाऊ खोतांचा बाबा आढाव यांना सवाल

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये आलेले निकाल त्याचबरोबर ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित करत, पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी तीन दिवस आत्मक्लेशउपोषण केले होते.

 

बाबा आढाव यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल ईव्हीएम बद्दल तसेच निवडणुकीआधी जाहीर केलेल्या योजना आणि पैशांचा गैरवापर याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाव यांच्यावर हल्लाबोल करत उलट सवाल उपस्थित केला आहे.

 

 

बाबा आढाव यांनी काल केलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना, कॉंग्रेसने आणलेले ईव्हीइम मशीन काँग्रेसच्या काळात आढाव यांना योग्य दिसत होते का? मुस्लिम बहुल भागातील मते नाही तिच्या विरोधात गेली तिथे ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली नाही असे आढाव यांना वाटत नाही का? असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत बाबा आढाव यांना लक्ष केलं आहे.

 

सदाभाऊ खोत यांची सोशल मिडिया पोस्ट
बाबा आढाव यांच्या भूमिकेवर आमदार सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. “बाबा आढाव साहेब, सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचा मला आदर आहे; तरी आपण ईव्हीएमवर टीका करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी. मुस्लिम बहुल भागात ईव्हीएम मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? तिथे महायुतीला कमी मते मिळतात, मग तिथे ‘सेटिंग’ का होत नाही? असे प्रश्न आता जनतेला पडले आहेत”. “जनतेचा कौल पचवता आला नाही की अशा आरोपांचा आधार घेतला जातो. विज्ञान युगात अशा निराधार आरोपांनी लोकशाहीची विश्वासार्हता कमी होत नाही, तर आरोप करणाऱ्यांची होत असते”, असंही पुढे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

 

EVM एकीकडे शंका तर दुसरीकडे समर्थन 
एकीकडे जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी EVM मशीन बाबत शंका उपस्थित करत, आत्मक्लेष आंदोलन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांनी हे उपोषण सोडले. तर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी EVM चे समर्थन केले. त्यामुळे राज्यात एकीकडे EVM वर शंका उपस्थित होत असून, दुसरीकडे मात्र EVM चे समर्थन देखील केले जात आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button