आटपाडीक्राईमताज्या बातम्यासांगली
विठलापुरात दिराकडून भावजयला मारहाण

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथे दिराकडून भावजयला मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सागर अरुण शेळके हा येवून फिर्यादीचे पतीचे नावाने व शिव्या देत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी माझे पतीला का शिव्या देता असे विचारले असता, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून फिर्यादीच्या डोक्याचे केस ओढून खाली पाडले. यामध्ये फिर्यादीस मार लागला. तसेच आरोपीने दगडाने देखील मारहाण केली.
याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी सागर अरुण शेळके रा. विठलापुर ता. आटपाडी जि.सांगली, याचे विरुदध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.