आटपाडीताज्या बातम्या

खानापूर विधानसभा मतदारसंघात ब्रम्हानंद पडळकरांचाच बोलबाला I यंदा बदल होणार,आमदार ब्रम्हानंद पडळकरच होणार, कार्यकर्त्यांनी दिला नारा

2024 च्या विधानसभेमध्ये यंदा बद्दल घडवणारच याच इराद्याने सर्व जनता व कार्यकर्ते कामाला लागले आहे.

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचा सध्या बोलबाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनतेतून त्यांना आता मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

2024 च्या विधानसभेमध्ये यंदा बद्दल घडवणारच याच इराद्याने सर्व जनता व कार्यकर्ते कामाला लागले आहे. जनतेतून आता उठाव होत असून 2024 ला खानापूर विधानसभा मतदार संघातून ब्रम्हानंद पडळकरच आमदार होणार असल्याचा नारा दिला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातून समाजकारण करत असताना विकासात्मक राजकारण करण्याकडे पडळकर बंधूनी केलेल्या कामातूनच ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.

 

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाची मोट बांधली आहे. विविध समाजाच्या महामंडळाची मागणी विधानपरिषदेत लाऊन धरल्याने सर्व अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला आहे. याचबरोबरवंचित, शोषित, उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका पडळकर बंधूनी नेहमीच ठेवली आहे. याच पावलावर पाऊल ठेवत समाजकल्याण विभागाचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह जनतेला विकास काय असतो ते दाखवून देत गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आहे.

आतापर्यंत खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित नेतेमंडळीनी जनतेला गृहीत धरूनच राजकारण केले आहे. या राजकारणाला फाटा देत पडळकर बंधूनी सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे. पडळकर बंधूंना जनतेतून आता पाठबळ मिळत असून खानापूर घाटमाथा, विसापूर सर्कल व विटा शहरातून ही मोठ्या प्रमाणात जनाधार मिळत आहे. नेतेमंडळी सह आता जनता जनार्दनच जागृत झाली आहे. त्यामुळे यंदा काही झाली तरी ब्रम्हानंद पडळकर यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार करणारच हा नारा जनतेने दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील गावात जाऊन प्रत्यक्ष भेट देत निधी दिला आहे. त्याचबरोबर प्रत्येक समाजाच्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळेच सध्या पडळकर बंधूंच्याकडे मतदारसंघातून ओढा वाढू लागला आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आता वाढत असलेला पाठिंबा व पडळकर बंधूंच्या रूपाने 2024 चा खानापूर विधानसभेचा आमदार होणार असल्याने विकास हा मोठ्या प्रमाणात खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये होईल हा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button