ताज्या बातम्यादेश-विदेश

मोठी बातमी : बांगलादेशच्या पंतप्रधान बहिणीसह देश सोडून अज्ञातस्थळी रवाना ; बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता? : वाचा सविस्तर

आरक्षणावरुन वादंग सुरु आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन, त्या सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्या. शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून त्या दोघीही सुरक्षित स्थळी निघून गेल्या आहेत.

बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण आहे. यामुळेच त्यांनी बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरुन वादंग सुरु आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.

 

  • पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

 

  • बांगलादेशमधील अस्थिरतेचे नेमके कारण काय?
    1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.

 

  • बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले?
    बांगलादेश लष्करप्रमुख वकार-उर-झमान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ⁠अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. सर्वांनी संयमी राहावे. आम्ही अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. सर्वांनी शांतता राखावी. हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. प्रत्येक हत्या आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांचा गांभीर्याने विचार केला जाईल. सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे आले होते आणि चांगली गोष्ट घडली आहे. सर्वपक्षीय बैठकीत अवामी लीगचे कोणीही नव्हतं. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. आम्ही अध्यक्षांशी बोलू. तुम्ही हिंसाचार करणार नाही,आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button