ताज्या बातम्या
आटपाडी नगरपंचायतचा कारभार अनागोंदी : दिवसा पथदिवे सुरू ; नगरपंचायतीचा कारभार : हसावं की रडावं!
नगरपंचायतीचा कारभार : हसावं की रडावं!

आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी नगरपंचायतीचा कारभार किती बेफिकीर व अनागोंदी पद्धतीने चालतो याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. शहरातील कोष्टी गल्ली परिसरामध्ये लावलेले पथदिवे दिवसा सुरू असल्याचे चित्र समोर आले असून यामुळे नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.