आटपाडीक्राईमताज्या बातम्या

आटपाडी : झरे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरीचा प्रयत्न

सेफ रूमला असलेल्या दरवाज्याचे व लोखंडी गेटचे कुलूप व कोंयडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील झरे येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु या घटनेने झरे परिसरात खळबळ उडली असून, सदर घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक ०७ रोजीच्या सायंकाळी, 6:30 वा ते दिनांक ०८ रोजीचे सकाळी 9.30 वा सुमारास बँक ऑफ इंडिया शाखा झरे येथे अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील दरवाज्याचे व ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

सेफ रूमला असलेल्या दरवाज्याचे व लोखंडी गेटचे कुलूप व कोंयडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु चोरट्यांना चोरी करण्यात यश आले नाही. याबाबत बँकेचे शाखाअधिकारी तुषार नानासाहेब मिंड यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button