आटपाडी : भिंगेवाडी येथील सचिन हजारेच्या मृत्यूस कारणीभूत अज्ञातावर गुन्हा दाखल
या अपघाताची फिर्याद रघुनाथ सुदाम हजारे यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे दिली आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : भिंगेवाडी येथील रहिवाशी असणाऱ्या सचिन हजारे या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील मयत सचिन सुदाम हजारे वय ३८ रा. भिंगेवाडी हा दुचाकी वरून सर्यांजेराव काळे यांना घेवून करगणी-आटपाडी रस्त्याने भिंगेवाडीकडे निघाला होता. दिनांक ११ रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास त्याच्या मोटार सायकलला अज्ञाताने उडविले.
मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने सचिन हजारे व सर्जेराव भिकाजी काळे हे दोघे मोटार सायकल वरून उडून पडले. यामध्ये सचिन हजारे याचा जागीच मृत्यू झाला होता. तर सर्जेराव काळे यास गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या अपघाताची फिर्याद रघुनाथ सुदाम हजारे यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे दिली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.