नोकरी

लगेच अर्ज करा आणि महाराष्ट्र राज्य नगररचना विभागात नोकरी मिळवा ! अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

मिळेल 38 हजार ते 1 लाख 22 पर्यंत मिळणार पगार

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या भरती प्रक्रियांना पुन्हा एकदा आता वेग देण्यात आला असून अशाप्रकारे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा एक संधीचे सोने करण्याचा कालावधी आहे. त्याचबरोबरीने आता महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांमध्ये देखील विविध रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात काढण्यात आली असून त्यानुसार आता जे इच्छुक व पात्र उमेदवार असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून भरतीचा लाभ घेण्याची गरज आहे.

  • पदाचे नाव आणि लागणारी शैक्षणिक पात्रता

1) रचना सहाय्यक( गट ब) या पदासाठीच्या एकूण 261 रिक्त जागा आहेत व याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/ नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

2) उच्चश्रेणी लघुलेखक( गट ब) उच्च श्रेणी लघुलेखक( गट ब) या पदासाठीच्या एकूण रिक्त जागा 9 असून यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता (i) दहावी उत्तीर्ण(ii) लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट(iii) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन म्हणजेच टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट

3) निम्न श्रेणी लघुलेखक( गट ब) या पदाच्या एकूण 19 रिक्त जागा असून त्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता (i) दहावी उत्तीर्ण(ii) लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट(iii) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट

  • आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील त्या उमेदवारांचे वय हे 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्ष असणे गरजेचे आहे व मागासवर्गीय व इतर प्रवर्गांना पाच वर्षाची सूट यामध्ये देण्यात येणार आहे.

  • पदानुसार मिळणारा पगार

महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये रचना सहाय्यक( गट ब) या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपये पर्यंत पगार मिळेल.

उच्च श्रेणी लघुलेखक( गट ब) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41 हजार आठशे ते एक लाख 32 हजार 300 रुपये पगार मिळेल.

निम्न श्रेणी लघुलेखक( गट ब)- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अडतीस हजार सहाशे ते एक लाख 22 हजार 800 रुपये पगार दिला जाणार आहे.

  • अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करायला जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button