आटपाडी
आटपाडी : जिल्हा बँक संचालक तानाजीराव पाटील यांच्या मातोश्री शेवंता (काकू) भगवान पाटील यांचे दुःखद निधन

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या मातोश्री शेवंता (काकू) भगवान पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. शेवंता (काकू) भगवान पाटील या साधेपणा, कुटुंबवत्सलता आणि सामाजिक जाणिवांसाठी परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांनी मोलाचे संस्कार रुजवले असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता क्रांतिसिंह नगर येथे होणार आहेत. .




