फडणवीस सरकारमध्ये “या” मंत्र्यांनी घेतली शपथ : सर्व मंत्र्यांची नावे एकाच क्लिकवर
माणदेश एक्सप्रेस न्युज : नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला विस्तार आज नागपूर येथे संपन्न झाला. या सरकारमध्ये अजित पवार व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे असणार आहेत.
तर मंत्री म्हणून भाजपकडून
कॅबिनेट मंत्री
१) चंद्रशेखर बावनकुळे २) राधाकृष्ण विखे-पाटील ३) चंद्रकांत पाटील ४) गिरीश महाजन ५) गणेश नाईक ६) मंगलप्रभात लोढा ७) जयकुमार रावल ८) पंकजा मुंडे ९) अतुल सावे १०) अशोक उईके (नवीन चेहरा) ११) आशिष शेलार १२) शिवेंद्रसिंहराजे भोसले (नवीन चेहरा) १३) जयकुमार गोरे (नवीन चेहरा) १४) संजय सावकारे (नवीन चेहरा यापूर्वी राष्ट्रवादीतून मंत्री होते) १५) नितेश राणे (नवीन चेहरा) १६) आकाश फुंडकर (नवीन चेहरा)
राज्यमंत्री
१७) माधुरी मिसाळ ( नवीन चेहरा) १८) पंकज भोयर (नवीन चेहरा) १९) मेघना बोर्डीकर-साकोरे (नवीन चेहरा)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून
कॅबिनेट मंत्री
१) हसन हसन मुश्रीफ २) धनंजय मुंडे ३) दत्तात्रय भरणे ४) कु. आदिती तटकरे 5) माणिकराव कोकाटे (नवीन चेहरा) ६) नरहरी झिरवाळ (नवीन चेहरा) ७) मकरंद जाधव-पाटील (नवीन चेहरा) ८) बाबासाहेब पाटील (नवीन चेहरा)
राज्यमंत्री
९) इंद्रनील नाईक (नवीन चेहरा)
शिवसेना पक्षाकडून
कॅबिनेट मंत्री
१) गुलाबराव पाटील २) दादा भुसे ३) संजय राठोड ४) उदय सामंत ५) शंभूराजे देसाई ६) संजय शिरसाठ (नवीन चेहरा) ७) प्रताप सरनाईक (नवीन चेहरा) ८) भरतशेठ गोगोवले (नवीन चेहरा) ९) प्रकाश आबिटकर (नवीन चेहरा)
राज्यमंत्री
१०) आशिष जैस्वाल (नवीन चेहरा) ११) योगेश कदम (नवीन चेहरा)
या सरकारमध्ये भाजपचे कॅबिनेट मंत्री म्हणून १६ जणांना संधी मिळाली असून राज्यमंत्री म्हणून ०३ अशी १९ जणांनी आज शपथ घेतली आहे. शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री म्हणून ०९ व राज्यमंत्री म्हणून ०२ अशा एकूण ११ जणांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून कॅबिनेट मंत्री म्हणून ०८ व ०१ राज्यमंत्री अशी ०९ जणांना संधी मिळाली आहे. त्यामुळे एकूण ३९ जणांनी आज मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.