ताज्या बातम्यामहाराष्ट्रसोलापूर

ब्रेकिंग : मारकडवाडीत उद्या आम. गोपीचंद पडळकर यांची जाहीर सभा

मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली होती.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांची EVM च्या समर्थनार्थ माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती राम सातपुते यांनी दिली.

 

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) हे गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या गावातील ग्रामस्थांनी EVM वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. मात्र, प्रशासनाने गावात जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

 

मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली होती. त्यानंतर उद्या (10 डिसेंबर) याच मारकडवाडी गावात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत येणार आहेत.

 

शरद पवार यांच्या काल मारकडवाडी गावात झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी उद्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मारकडवाडी गावच्या दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा होणार आहे. मोहिते पाटील यांची जुलमी राजवट उध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना ट्विटद्वारे आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button