आटपाडीताज्या बातम्याराजकीय

आटपाडी तालुक्यातील बाबर, पडळकर समर्थकांचा हिरमोड

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ताकाबीज केली. महाविकास आघाडीचा धुव्वा उडविला. महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने, साहजिक मुख्यमंत्री भाजपला मिळणार हे निश्चित होते. परंतु महायुतीमधील शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद ऐवजी गृहमंत्रीपदावर अडून बसल्याने, सरकार स्थापन करण्यात अनेक अडचणी आल्या.

एकतर्फी बहुमत मिळून देखील सत्ता सरकार स्थापन करण्यास होत असलेला विलंब यामुळे विरोधी पक्षाकडून महायुतीला टार्गेट करण्यात येत होते. परंतु हो…ना…. करत अखेर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे हे सरकार मध्ये सामील होणार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या जीवात जीव आला.

नव्या सरकारचा शपथविधी हा आज दिनांक ०५ रोजी सायंकाळी होणार आहे. जिल्ह्यातून जत मतदार संघातून भाजपकडून निवडून आलेले गोपीचंद पडळकर व खानापूर मधून शिवसेनेचे सुहास बाबर हे निवडून आले. नव्या सरकारमध्ये संभाव्य मंत्री मंडळात या दोघांचा समावेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त होते. त्यामुळे गोपीचंद पडळकर व सुहास बाबर यांचे समर्थक मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईला गेले होते.

परंतु काल दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. सांयकाळी महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदमध्ये मात्र मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघेजण शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याने, शपथविधी गेलेल्या समर्थकांचा मोठा हिरमोड झाला असून अनेकांचे पास वाया गेले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button