आटपाडी नगरपंचायतच्या कृपेने रस्त्यावर सांडपाणी ; प्रवाशी वर्गातून संताप
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील सिद्धनाथ चित्र मंदिर ते बाजार पटांगण या मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरले आहे. परिणामी रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून येथील सांडपाणी वाहिनी तुंबून रस्त्यावर पाणी पसरत आहे. या ठिकाणी भूमिगत वाहिन्या लिकेज झाले असल्याने, ते पाणी देखील गुलाल कलेक्शन समोर रस्त्यावर येते असल्याने पाणी थेट मुख्य रस्त्यावर येत आहे. याचा पाण्याचा नागरिक व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथून वाहने वेगात जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. परिणामी वादाचे प्रसंग उद्भनवत आहेत. तसेच याठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने पाणी आणि मातीमुळे दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. नगरपंचायतीने रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या पाण्याचा व तुंबलेल्या सांडपाणी वाहिनीचे साफसफाई करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.