ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

‘ताई, सरडा पिंक कसा झाला?’ संजय राऊतांचा अजित पवारांना टोला, सभागृहात एकच हास्यकल्लोळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक (गुलाबी) रंगाचे जॅकेट घालायला सुरुवात केली आहे. हा रंग शुभ असल्याचं अजितदादांना सांगितलं गेलं आहे. त्यामुळेच त्यांनी या रंगाचे जॅकेट रोज घालायला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. सुप्रिया ताई, तुमच्या लाडक्या भावाने पिंक रंग वापरायला सुरुवात केली आहे. ताई, सरडा पिंक कसा झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी हा सवाल करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

महाविकास आघाडीचा माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. सर्वच नेत्यांची यावेळी भाषणे झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडीने हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांना पिंक रंगावरून जोरदार टोले लगावले.

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहिणीसाठीच बारामतीत महाराष्ट्र लढला. तुमच्या लाडक्या भावाने तर आता रंग बदलला आहे. ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो. पण तो अचानक पिंक कसा होऊ शकतो? असा सवाल अजितदादांनी केला. गुलाबी रंग हा महाराष्ट्राचा रंग नाही. महाराष्ट्राचा रंग भगवा आणि तिरंगा आहे. केसीआर यांनी तेलंगणात गुलाबी रंग घेतला. त्यांचा पराभव झाला. हे सुद्धा जातील, असा टोला त्यांनी लगावला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button