ताज्या बातम्या

ग्राहकांना मोठा दिलासा! डाळींच्या किंमती होणार स्वस्त,वाचा सविस्तर


भारताची डाळ उद्योगाची संघटना, युनिट इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने (IPJA) डाळीच्या किंमतीविषयी मोठी अपडेट दिली आहे. देशात डाळीची आयात घटण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. त्यानुसार आता देशात डाळींची आयात कमी होईल. तरीही डाळीच्या किंमती आटोक्यात येतील. ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना खाद्यान्न महागाईचा सामना करावा लागत आहे. आता डाळीच्या किंमती कमी झाल्यास किचन बजेटवरील खर्च कमी होईल.

सरकारने करावी योजना

IPJA च्या चेअरमन बिमल कोठारी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, यावर्षी भारतात डाळीची आयात कमी होईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा डाळीची आयात 40-45 लाख टनावर येईल. यंदा मान्सून चांगला असल्याने डाळीच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. या 2.5 लाख कोटी रुपयांच्या डाळ बाजाराकडे सरकारने लक्ष देण्याची आणि विशेष योजना आखण्याची मागणी आयपीजेएने केली आहे. तर पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क लावण्याची मागणी त्यांनी केली.

आयात घसरणार

दिल्लीत राष्ट्रीय डाळी कार्यक्रम 2024 मध्ये कोठारी यांनी डाळीविषयीची माहिती दिली. या आर्थिक वर्षात आयात आयात 40-45 लाख टन राहण्याची शक्यता आहे. या कृषी हंगामात डाळीचे उत्पादन अधिक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीपेक्षा डाळींची आयात कमी होण्याची दाट शक्यता आहे.

पिवळ्या वाटाण्याची आवक घटेल

कोठारी यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात 16 लाख टन मसूर डाळ आयात करण्यात आली होती. यंदा आतापर्यंत 10 लाख टन मसूर डाळ आयात करण्याचा अंदाज आहे. तर पिवळ्या वाटाण्याची आयात 2023-24 आर्थिक वर्षापेक्षा कमी होईल. त्यांनी पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क लावण्याची मागणी लावून धरली आहे.

इतकी होईल किंमत कमी

यंदा पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. खरीप सत्रात डाळींचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. घरगुती उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात ठोक बाजारात डाळीच्या किंमतीत घसरण झाल्याची माहिती कोठारी यांनी दिली. गेल्या एका महिन्यात ठोक बाजारात तुरीच्या किंमती 20 रुपये प्रति किलो कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button