क्राईमताज्या बातम्या

धक्कादायक! कॅफेच्या महिलांच्या टॉयलेटमध्ये आढळला रेकॉर्डिंग सुरु असलेला फोन

बेंगळूरू येथील एका नामांकित कॅफेतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॅफेच्या टॉयलेटमध्ये असलेल्या कचऱ्याचा डब्ब्यात संशयित मोबाईल फोन आढळून आला आहे. या घटनेची माहिती एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर केली. महिलेने दावा केला की, वॉशरुममध्ये एकाचा फोन सापडला. त्यानंतर हा मोबाईल कॉफी शॉपच्या कर्मचाऱ्याचा असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरुमधील बीईएल रोडवरील थर्ड वेव्ह कॉफी शॉपमध्ये ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे रेकॉर्डिंग सुरु ठेवून मोबाईल फोन डस्टबिनमध्ये ठेवण्यात आले होते. फोनचा कॅमेरा टॉयलेटच्या समोर होता. फोनचा आवाज येऊन नये म्हणून फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्यात आला होता. गेल्या दोन तासांपासून रेकॉर्डिंग सुरु असल्याचा दावा करण्यात आला.

डस्टबिन बॅगमध्ये छिद्र करण्यात आले होते आणि त्यातून मोबाईलचा कॅमेरा लपवण्यात आला. ज्यामुळे वॉशरुम वापरत असलेल्या कोणालाही रेकॉर्ड करू शकत होता. या घटनेमुळे कॅफेत टॉयलेट वापरणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे दिसून आले. महिला सुप्रसिध्द कॅफेत देखील असुरक्षित असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

एकाने इन्स्टाग्रामवर या घटनेची पोस्ट शेअर केली. या घटनेला अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली. या घटनेनंतर कॅफेच्या मालकाला माफिनामा सादर करावा लागला. कॅफे मालकाने सांगितले की, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.

पहा पोस्ट:

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button