क्रीडाताज्या बातम्या

५७ किलो कुस्ती स्पर्धेत अमन सेहरावत यांनी कांस्यपदक जिंकले, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेत अमन सेहरावत यांनी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भारतीयांची मान उंचावली आहे. अमनच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 21 वर्षीय पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रुझला 13-5असा पराभूत करून कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिले आहे. अमनने वैयक्तिक पदक जिंकून साऱ्या भारतीयांचे मनं जिकंली आहे. सोशल मीडियावर अमन सेहरावतचे कौतुक केले जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने 6 मेडल जिंकले आहेत ज्यात, पाच कांस्यपदक आणि एक सिल्वर पदक आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button