क्राईमताज्या बातम्या

विट्यात किरकोळ वादातून युवकाचा निर्घृण खून ; संशयीत आरोपीस विटा पोलिसांकडून अटक

भरदिवसा निर्घृण खून झाल्याने विटा परिसरात खळबळ उडाली आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : विटा येथे किरकोळ कारणातुन एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे असून, या प्रकरणी संशयित आरोपी तात्यासो पवार यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. भरदिवसा निर्घृण खून झाल्याने विटा परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे आणि तात्यासो साहेबराव पवार यांच्यात काही कारणावरून वादावादी सुरू झाली. या वादातून तात्या पवार याने आपल्याजवळ असणाऱ्या धारदार शस्त्राने चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे याच्यावर खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे जखमी झाला.

त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमीला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु चिक्या उर्फ प्रीतमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या खळबळजनक खुनाच्या घडनेनंतर विटा पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी तात्यासो पवार याला ताब्यात घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button