करगणीताज्या बातम्या

आटपाडी : करगणीच्या शेतकऱ्याने तहसीलदारांच्याकडे मागितली आत्महत्या करण्याची परवानगी : काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

जिल्हा बँकेच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे....

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : शेतीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत व जिल्हा बँकेकडे अनेक वेळा मागणी करून कर्ज देण्यास नकार दिल्याने अखेर करगणी ता. आटपाडी येथील जनक दशरथ सरगर या शेतकऱ्याने आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे अर्ज करत आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

 

यामुळे आटपाडी तालुक्यामध्ये मोठी खळबळ माजली असून जिल्हा बँकेच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे शेतकरी जनक सरगर यांनी सांगितले.

दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, एक जून 2024 पासून करगणी येथील विकास सोसायटी यांच्याकडे पीक कर्जाची मागणी केली आहे. मात्र विकास सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व जिल्हा बँकेचे करगणी शाखेतील अधिकारी यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली आहे.

 

शेतीसाठी खते, बियाणे, मशागत करणे यासह उसनवारी घेतलेले पैसे देण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. मात्र अद्याप कर्ज मिळत नाही. याबाबत तहसीलदार यांनी कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा मला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी.

 

मी एक छोटा शेतकरी असून शेती द्वारेच माझ्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मागील दोन महिन्यांपासून मी विकास सोसायटी कडे पन्नास हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. मात्र मला कर्ज फक्त पंधरा ते सोळा हजारच देतो असे आता बँकेतील अधिकारी म्हणत आहे.
शेतकरी जनक सरगर

 

पीक, क्षेत्र आणि धोरणानुसार संबंधित शेतकऱ्यास २५ हजार रुपयांचे कर्ज देऊ शकतो. पण त्यांची कर्ज मागणी जास्त असल्याने त्याची पूर्तता होत नाही.
हारूण जमादार, जिल्हा बँक अधिकारी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button