आटपाडीताज्या बातम्या

नाद करा, पण आमचा कुठ ; आटपाडी शेळी-मेंढी बाजारात पाच कोकराची तब्बल १९ लाख रुपयांना विक्री….

आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार नुसता चर्चेत आला नाही तर. याचा खरेदी-विक्री सोहळा देखील मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार सध्या नावारूपाला येत आहे. या बाजारात अनेक ठिकाण हून व्यापारी वर्ग शेळी-मेंढी खरेदीसाठी येत असतात. तर अनेक शेतकरी या ठिकाणी शेळी-मेंढी विक्री करण्यासाठी आणत असतात. या ठिकाणी व्यापारी शेळी-मेंढ्याची योग्य किंमत करत असल्याने शेतकरी वर्ग आटपाडीच्या शेळी-मेंढी बाजाराकडे आकर्षित होत आहे. तर या ठिकाणी शेळी-मेंढी बाजाराला चालना देण्यासाठी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी (Santosh Pujari) यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

 

आज दिनांक १७ रोज आटपाडीच्या शेळी-मेंढी बाजारात चार महिन्यांच्या मेंढ्याच्या पाच कोकरांना तब्बल १९ लाख रुपयांना विक्री झाल्याने पुन्हा एकदा आटपाडीचा शेळी-मेंढी बाजार नुसता चर्चेत आला नाही तर. याचा खरेदी-विक्री सोहळा देखील मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी सोहळ्याला सांगलीचे खासदार विशाल पाटील (MP Vishal Patil Sangli) यांच्यासह सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, (Suhas Babar) सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (Tanaji Patil) यांनी देखील हजेरी लावली होती.

 

आटपाडी येथील शेतकरी सोमनाथ जाधव शेळी-मेंढी पालन करतात. त्यांच्या चार महिन्यांच्या कोकराची विक्री करण्यासाठी त्यांनी आटपाडी शेळी-मेंढी बाजारात कोकरी आणली होती. यावेळी आंबेवाडी येथील शेतकरी उत्तम पुजारी (शेठ) यांनी पाच कोकरी तब्बल १९ लाख रुपयांना विकत घेतली. यावेळी बाजार समितीचे वतीने सोमनाथ जाधव व उत्तम पुजारी (शेठ) यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला यावेळी मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button