खानापुर विधासभा मतदार संघात सकाळच्या सत्रात “एवढे” टक्के मतदान
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदान प्रक्रिया सुरु आहे. आज सकाळी ७.०० ते ११.०० च्या दरम्यान १६.२५ टक्के मतदान संपन्न झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३५०९९६ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार हे १७७५४२ असून स्त्री मतदार हे १७३४३५ मतदार आहेत असून इतर १९ मतदार आहेत. आज झालेल्या सकाळी ७.०० ते ११.०० च्या दरम्यान एकूण ५७०४९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३४६७० पुरुष, २२३७७ स्त्री तर इतर २ अशा एकूण ५७०४९ मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे. तर मतदान टक्केवारी १६.२५ टक्के आहे.
खानापुर विधानसभा मतदार संघात, महायुती कडून सुहास बाबर, महाविकास आघाडी कडून वैभव पाटील तर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने, या ठिकाणी निवडणीत मोठी रंगत आली आहे. प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते नागरिकांना मतदान करण्यासाठी आणत आहेत.